पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी या प्रकारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहे. नाव न सांगण्याच्‍या अटीवर नाशिकमधील एकाने यासंदर्भात धक्‍कादायक माहिती दिली.

पहिल्‍या दिवशीचा पॉझिटिव्ह अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह 

परिचयातील दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाल्‍यानंतर सावधगिरी म्‍हणून ते आठवडाभर विलगीकरणात राहिले. काहीही लक्षणे किंवा त्रास होत नव्‍हता. पण, शंकेचे निरसन करावे म्‍हणून कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी स्‍वॅब दिले. संबंधित प्रयोगशाळेकडून कोरोना पॉझिटिव्‍ह असल्याचा अहवाल मिळाल्याने त्‍यांना धक्‍काच बसला.फेरपडताळणीसाठी दुसऱ्या दिवशी अन्‍य एका प्रयोगशाळेतून स्‍वॅब तपासणी केली, तर आणखी मोठा धक्‍का बसला. दुसऱ्या प्रयोगशाळेकडून मिळालेला अहवाल चक्‍क निगेटिव्‍ह होता. या गोंधळलेल्‍या कारभारामुळे मात्र संबंधित चक्रावले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी या प्रकारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहे. नाव न सांगण्याच्‍या अटीवर नाशिकमधील एकाने यासंदर्भात धक्‍कादायक माहिती दिली. त्‍यांनी सांगितल्‍यानुसार काही दिवसांपूर्वी त्‍यांनी परिचितांसोबत बाहेरगावाहून प्रवास केला होता. परतल्‍यानंतर काही दिवसांनी सोबतच्‍या दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याची माहिती कळाली.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

धक्‍कादायक प्रकार : खासगी प्रयोगशाळांच्‍या कारभारावर प्रश्‍नचिन्‍ह

कुटुंबीयांची काळजी म्‍हणून संबंधितांनी सदस्‍यांपासून वेगळ्या खोलीत राहण्यास सुरवात केली. आठवडा उलटला असताना कुठल्‍याही स्‍वरूपाची लक्षणे मात्र जाणवत नव्‍हती. तरीदेखील शंका नको म्‍हणून त्‍यांनी खासगी लॅबमध्ये जाऊन स्‍वॅब तपासणी केली. त्‍यातच त्‍यांना कोरोना झाला असल्‍याचा अहवाल प्राप्त झाला. आपल्‍याला काहीही त्रास होत नसल्‍याने अहवालावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करत, दुसऱ्या दिवशी अन्‍य एका लॅबमध्ये तपासणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. खासगी लॅबमध्येच तपासणी केली असता, हा रिपोर्ट निगेटिव्‍ह आला असल्‍याचे निदर्शनास आले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

हा तर जिवासोबत खेळ 
यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना संबंधितांनी सांगितले, की हा तर रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांच्‍या जिवाशी खेळ सुरू आहे. अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याची माहिती मिळाल्‍याने अनेक लोक घाबरतात, दडपण घेतात. पण प्रत्‍यक्षात त्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हाच मोठा प्रश्‍न आता पडू लागला आहे.