पांडवलेणी डोंगरावर अडकले तिघे; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

नाशिक : पांडवलेणी डोंगराच्या पूर्व बाजूस असलेल्या सुळक्यावर तीन पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. सिडको अग्निशमन दल आणि वैनतेय गिरिभ्रमण संस्थेची टीम संबंधित ठिकाणी पोचली असून या युवकांना खाली सुखरूप उतरवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अत्यंत अवघड अशा ठिकाणी हे युवक असल्याने रेस्क्यूसाठी मोठा वेळ लागण्याची शक्यता आहे. 

Image

डोंगराच्या माथ्यावर ही मुले अडकून पडली असून त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मनपा अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.पांडवलेणीच्या डोंगरावरुन उतरत असताना अडकून पडली. चढाई करणारे तिघे हौशी मुले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डोंगरावर चढले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहचली; मात्र त्यांना उतरताना धाडस कमी पडू लागले आणि वाळलेल्या रानगवतावरुन पाय घसरु लागल्याने त्यांनी माथ्यावरच दगडांचा आधार घेत मोबाईलद्वारे पोलीस नियंत्रण कक्ष व मनपा अग्निशमन दलाकडे मदत मागितली.

Image

घटनेची माहिती मिळताच तत्काळ सिडको अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळ दाखल झाले.तीनही मुले डोंगराच्या माथ्यावर अडकलेले असल्यामुळे जवानांनी त्यांना भोंग्यावरुन सुचना देत धीर दिला आणि दोरखंड व जाळी घेऊन जवानांनी आता डोंगरावर चढाई करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तासाभरात तीनही मुलांना सुखरुप रेस्क्यू करुन डोंगराच्या पायथ्याशी आणण्यास जवानांना यश येईल, असा आशावाद अग्निशमन दलाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.  "