
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. नाशिकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान माफी मांगो, या बिलावल भुट्टोचं करायचं काय खाली डोकं वरती पाय अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला.

बिलावल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्र मंत्री आहेत, अशी टीका केली होती. बिलावल भुट्टोच्या या वक्तव्याविरोधात नाशिकच्या रविवार कारंजा येथे भाजपकडून आज (दि.17) हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह, अजिंक्य सहाने, देवदत्त जोशी, सुरेश पाटील, उत्तम उगले, शर्मिला जोशी, सुजाता करंजगीकर, भारती बागुल, रोहिणी नायडू, माधुरी पालवे, संगीता जाधव, राजनंदिनी स्वाती भूमकर, ज्याती दिंडोरकर, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
- Rishabh-Virat Catch : विराटने ‘सोडला’, पंतने ‘टिपला’… हा कॅच पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, क्या बात है!
- भोर : आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका गेल्या कुठे ?
The post पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.