पाच रुपयांत शिवभोजन निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ; पालकमंत्र्यांचा शब्द

नाशिक : राज्यातील गरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. 

पाच रुपयांत शिवभोजन निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ 

कोरोना विषाणू संसर्ग अद्याप कमी झाला नसल्याने पाच रुपयांत शिवभोजन देण्याच्या निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सांगून भुजबळ म्हणाले, की सुरवातीला दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आला होता. त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा एप्रिल २०२० पासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली. तसेच भोजनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून, सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी थाळीला ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी ३० रुपये अनुदान सरकार देत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

थाळीचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या
 
० जानेवारी २०२० : ७९ हजार ९१८ ० जुलै २०२० ः ३० लाख ३ हजार ४७४ 
० फेब्रुवारी २०२० : ४ लाख ६७ हजार ८६९ ० ऑगस्ट २०२० ः ३० लाख ६० हजार ३१९ 
० मार्च २०२० : ५ लाख ७८ हजार ३१ ० सप्टेंबर २०२० ः ३० लाख ५९ हजार १७६ 
० एप्रिल २०२० : २४ लाख ९९ हजार २५७ ० ऑक्टोबर २०२० ः ३१ लाख ४५ हजार ०६३ 
० मे २०२० : ३३ लाख ८४ हजार ०४० ० नोव्हेंबर २०२० ः २८ लाख ९६ हजार १३० 
० जून २०२० : ३० लाख ९६ हजार २३२ ० डिसेंबर २०२० ः २८ लाख ६५ हजार ९४३ 

(१ ते २० जानेवारी २०२१ या २० दिवसांमध्ये १९ लाख २६ हजार ५४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.)  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार