पाण्यावर तरंगणार मृतदेह बघून सगळ्यांचाच उडाला थरकाप; घटनेने परिसरात खळबळ

देवळा (नाशिक) : लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात रविवार (ता. २२) रोजी रात्री सटाणा येथील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश गोवर्धनदास मखिजा (वय ६२) यांनी खोल पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.  

पाणीपुरवठा योजनेजवळ सापडला मृतदेह

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, रविवारी (ता. 22) रात्री सात वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गिरणा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारल्याचे लक्षात आल्याने तातडीने शोध तपास सुरू झाला. उशिरापर्यंत शोध घेऊनही यश न आल्याने आज सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी पाणीपुरवठा योजनेजवळ मृतदेह सापडला. आणि तेव्हा सदर मृतदेह हा सटाणा येथील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश माखिजा यांचा असल्याचे लक्षात आले. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?