पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा

गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

न्यायालयाने एसीबीला फेर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या. त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे, ते ठरवा. अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना जेलमध्ये टाकून निवडणुका पार पाडायच्या आहे .मात्र मी त्यांच्या उरावर बसेल ,असे वाक्य वापरून भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. या टीकेला धुळ्यात शुक्रवारी (दि.28) पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई आणि परिवारांच्या सदस्यांसह खडसे यांच्यावर असलेले आरोप कोर्टाने आदेश केल्याने चौकशी थांबवली आहे .त्यामुळेच त्यांच्यावरील कारवाई थांबली आहे. पण आता पुणे कोर्टाने पुन्हा फेर चौकशीचे आदेश दिले आहे .एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या, त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे ते ठरवा .असा टोला मंत्री महाजन यांनी मारला. खडसे हे ज्येष्ठ नेते तसेच मुख्यमंत्री स्तरावरील नेते आहेत. त्यांनी अशा पद्धतीने भाषा वापरणे, मला संयुक्तिक वाटत नाही .त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो आहे. असेही त्यांनी सांगितले .खडसे यांनी आपल्या काळात काय काम केले व काय नाही ,याची महाराष्ट्राला जाणीव आहे. पेन ड्राईव्ह च्या माध्यमातून त्यांचे सर्व कारनामे जनतेच्या समोर आले आहेत. त्यामुळे त्यांना आता सरकार बदलले आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत. असे म्हणण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या विरोधातील चौकशी ही निरपेक्षपणे चालू आहे .या चौकशी संदर्भात त्यांनी कोर्टात त्यांची बाजू मांडू शकतात. एकदा सर्व समोर गोष्टी येऊ द्या ,मग तुम्हाला कुठे बसायचे ते बसा, असा टोला देखील मंत्री महाजन यांनी यावेळी मारला.

हेही वाचा:

The post पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा appeared first on पुढारी.