पालकमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी; शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

इगतपुरी (जि. नाशिक) : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरीतून जात असलेला समृद्धी महामार्गाची पाहणी केली. तालुक्यातील समृद्धीग्रस्त शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव पाहणी दौरा करण्यात आला.

शेतकऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचत दिले निवेदन

 दौऱ्यामध्ये समृद्धीबाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही मोबदला मिळाला नाही. तसेच, समृद्धी महामार्गाच्या कामात शेतकऱ्यांच्या पाइपलाइन फुटून त्याचा मोबदलासुद्धा मिळाला नाही. यानंतर काम सुरू असताना होणाऱ्या स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेल्याने त्याची भरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचत निवेदन दिले. स्थानिक वाहनमालकांना समृद्धी महामार्गाच्या कामात काम मिळत नाही. कामात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, अशा अनेक समस्यांचा पाढा शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे यांच्या समोर वाचला.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

सर्व समस्या सोडविण्याचे आदेश 

या वेळी इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या जी. व्ही. पी. आर व अफकॉन या दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनाला बोलावून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके, उदय जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरुण गायकर, आगरी समाज सचिव भोलेनाथ चव्हाण, युवा नेते ज्ञानेश्वर कडू, शिवा काळे, सरपंच ज्ञानेश्वर तोकडे, पांडुरंग शिंदे, सुरेश कडू, निवृत्ती तुपे, मदन बिनर, सिद्धार्थ भांबरे यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट