पालकमंत्र्यांच्या कोरोना बैठकीतील तिघे पॉझिटिव्ह; अनेकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी त्यांनी भुजबळ फार्मवर जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक घेतली होती. पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कोरोना आढावा बैठकीत उपस्थित राहिलेल्या तिघांचे आवहाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्याच्या वाढत्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठीच्या आढावा बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी जिल्हाधिकारी कार्यालायातील विविध ६१ जणांच्या सोमवारी (ता. २२) तातडीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत राहाणारे तिघे पॉझिटिव्ह

पालकमंत्री पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेल्या या चाचण्यांत जिल्हाधिकारी सूरज मांढरे निगेटिव्ह आले असले, तरी त्यांचा वाहनचाचालक, सुरक्षारक्षक आणि सहाय्यक अशा तिघांचा त्यात समावेश आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासोबत फिरणारे तिघे पॉझिटिव्ह आले, तरी उर्वरित ५८ जण मात्र निगेटिव्ह आले. त्यामुळे बैठकीनंतर भुजबळ यांच्या पॉझिटिव्ह सापडण्याच्या वृत्ताने हवालदिल झालेल्यापैकी अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे..  

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ