पालिकेत स्थानिक अधिकाऱ्यांच्या नाखुशीचा विषय पुन्हा चर्चेला! 

नाशिक : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्ज दिल्याने पुन्हा एकदा अनुभवी व स्थानिक अधिकाऱ्यांच्या महापालिकेत सेवा देण्याच्या नाखुशीचा विषय चर्चेला आला आहे. 

अधीक्षक अभियंता चव्हाणके यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज 
महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असताना अधिकारी व कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी सातत्याने अर्ज देत आहेत. गेल्या तीन वर्षांत शहर अभियंता सुनील खुने यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ कार्यकारी अभियंता गौतम पगारे, प्रमोद गायकवाड, एस. वाय. पवार, विधी अधिकारी बी. यू. मोरे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, प्रशांत मगर या अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, यू. बी. पवार व अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता. परंतु तो नामंजूर करण्यात आला.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

अधिकारी वर्गात स्वेच्छानिवृत्तीच्या प्रमाणात वाढ

त्यानंतर प्रभारी शहर अभियंता संजय घुगे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज महासभेने नामंजूर केला. आता पाणीपुरवठा व विद्युत विभागाचा प्रमुख कार्यभार असलेले चव्हाणके यांनी अर्ज दिला आहे. पालिकेत सात हजार ९० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे सध्या चार हजार ८०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. नवीन भरती होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही. त्यात कामाचा ताण वाढत असल्याने अधिकारी वर्गात स्वेच्छानिवृत्तीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ