पालेभाज्या दराने गाठली उच्चांकी पातळी! महिलांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता 

पंचवटी (जि.नाशिक) : एकीकडे स्वयंपाकाचा गॅस, डाळींचे भावाने उसळी घेतली असतानाच भाजीपाला महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरवात केली आहे. या मुळे किरकोळ बाजारात सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांनी उसळी घेतल्याने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

महिलांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता

गत महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यात मोठी वाढ झाली आहे. उन्हाच्या झळांनी पालेभाज्या शेतातच करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्याने कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास ते साठ रुपये, तर मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत आहेत. पालेभाज्या महागल्याने टोमॅटो, कारली आदी अन्य वेलवर्गीय भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. याशिवाय एक किलो गवारसाठी ८० ते शंभर रुपये मोजावे लागत आहेत. त्या मुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट एप्रिलमध्येच कोलमडले आहे. उन्हाच्या तीव्रतेने दिंडोरी रस्त्यावरील नाशिक बाजार समितीतील आवकही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्या मुळे पुढील काळात भाज्या चढ्या दरानेच खरेदी कराव्या लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे स्वयंपाकाचा गॅस, डाळींचे भावाने उसळी घेतली असतानाच भाजीपाला महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

एका लिंबासाठी मोजावे लागतात दहा रुपये 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरवात केली आहे. त्या मुळे मेथी, कोथिंबीर, शेपू आदी पालेभाज्या शेतातच करपू लागल्या आहेत. या मुळे किरकोळ बाजारात सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांनी उसळी घेतल्याने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोठ्या मागणीनंतरही आवक घटल्याने औषधी समजल्या जाणाऱ्या एका लिंबासाठी चक्क दहा रुपये मोजावे लागत आहेत. 

आवक घटल्याचा परिणाम 
फेब्रुवारीच्या सुरवातीला दहा रुपयांत पाच लिंब उपलब्ध होत होते. मात्र, मोठ्या मागणीनंतरही आवक घटल्याने आता किरकोळ बाजारात एका लिंबासाठी चक्क दहा रुपये मोजावे लागत आहेत. बाजार समितीत नगर जिल्ह्यासह येवला तालुक्यातून लिंबांची मोठी आवक होते. समितीत रोज ८० ते शंभर क्विंटलपर्यंत लिंबाच्या गोण्यांची आवक होते. एका गोणीत साधारणः हजारपर्यंत लिंबू असतात. परंतु उन्हाच्या तीव्रतेमुळे लिंबाच्या उप्तादनावरच परिणाम झाला असून, त्या मुळे आवक घटली आहे. त्या मुळे किरकोळ बाजारात एका लिंबासाठी चक्क दहा रुपये मोजावे लागत आहेत. पुढील महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यताही विक्रेत्यांनी वर्तविली आहे.