पाळीव कुत्र्याला शेतात बांधून ठेवणे भोवले! तासाभरातच खेळ संपला; मोबाईलमध्ये दृश्य कैद

खेडभैरव, सर्वतीर्थ टाकेद (जि.नाशिक) : शेतकरी बबन झोले यांनी पिकांच्या राखणीसाठी त्यांच्या पाळीव श्वानाला शेतात बांधून ठेवले होते. सकाळी दहाच्या सुमारास ते आपल्या शेतातील विहिरीजवळ श्वानाला बांधून निघून गेले. त्यानंतर जवळपास तासाभरात परत ते श्वानाजवळ आले तेव्हा सारं काही संपलं होतं. काय घडले वाचा...

तासाभरातच खेळ संपला...

वासाळी (ता. इगतपुरी) येथील वाघेवाडी वस्तीवर सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने शेतकरी बबन झोले यांच्या पाळीव श्वानावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. वासाळी येथील शेतकरी बबन झोले यांनी घराशेजारी हरभरा व वाटाणा पिकांच्या राखणीसाठी त्यांच्या पाळीव श्वानाला शेतात बांधून ठेवले होते. रविवारी (ता. ६) सकाळी दहाच्या सुमारास ते आपल्या शेतातील विहिरीजवळ श्वानाला बांधून निघून गेले. त्यानंतर जवळपास तासाभरात परत ते श्वानाजवळ आले तेव्हा त्यांचा श्वान त्यांना मृतावस्थेत त्याचे शरीर फाडलेले त्यांना दिसले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना बिबट्याच्या हल्ल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी आपल्या पाळीव श्वानाला त्याच अवस्थेत दुसऱ्या शेतात लाकडाला बांधून ठेवले व शेजारील झाडाला फोन बांधून कॅमेरा सुरू ठेवला. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

मोबाईलच्या कॅमेऱ्यात सर्व प्रकार पाहिला,
मृतावस्थेत श्वानाला ज्या ठिकाणी बांधून ठेवले त्या जवळच लावलेल्या फोनचा कॅमेरा लावून ते निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने परत ते येताच त्यांना मृतावस्थेत बांधलेल्या श्वानाचे शरीर गायब झाल्याचे दिसले. त्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात सर्व प्रकार पाहिला, तर त्यात एक बिबट्या येऊन श्वानाला घेऊन गेल्याचे दृश्‍य कैद झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, सरपंच काशीनाथ कोरडे, गणप्रमुख भिका पानसरे, महेश गाढवे आदींनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले