
पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर स्टेडियम येथे धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची वरिष्ठ गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. मौजे फुलगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे होणाऱ्या 66 व्या वरिष्ठ गट अजिंक्यपद राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पिंपळनेर येथील शिवाजी व्यायामशाळेचा पठ्ठा पैलवान जगदीश जाधवची निवड करण्यात आली असून ते धुळे येथील हर हर महादेव विजय व्यायामशाळेत सराव करत आहे.
त्याला जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष रावसाहेब गिरासे, सचिव सुनील चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष रवींद्र आघाव, पै. हिरामण जाधव, पै.मनोज जाधव, जेष्ठ पै.रोहिदास कोळी, पै.नितीन नगरकर, पै.संभाजीराव ढोले, सागर खांडेकर, रवींद्र माळी, आदींचे मार्गदर्शन लाभले. पिंपळनेर शहरात खंडोजी महाराज यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या नामसप्ताहामध्ये पै. जगदीश हिरामण जाधव यांची मानाची कुस्ती अवश्य लावली जाते.
हेही वाचा :
- Anemia in children: राज्यात ६३ हजार मुले ॲनिमियाग्रस्त; २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी
- छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी २० वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवली
- Afghanistan News: अफगाणिस्तानात रुग्णांवर अफूद्वारे उपचार; तालिबान राजवटीनंतर आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
The post पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.