पिंपळनेरला खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने आजपासून युवा नेतृत्व, समुदाय विकास कार्यक्रम शिबिर

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
नेहरू युवा केंद्र धुळे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दि.24 ते 26 जानेवारी दरम्यान युवा नेतृत्व व समुदाय विकास कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अशोक कुमार मेघवाल क्रीडा अधिकारी, संभाजी अहिरराव अध्यक्ष असोसिएशन, जगदिश ओझरकर संचालक असोसिएशन, डॉ. प्रतिभा देशमुख – चौरे, समाजसेविका, नाना पाटील कार्यक्रम पर्यवेक्षक, सोनाली पाटील मुख्याध्यापिका राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम पिंपळनेर, अनिल पाटील क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा समन्वयक साक्री तालुका संयोजक समिती यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कुमार मेघवाल होते. नाना पाटील यांनी प्रास्ताविकेत युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रतिभा चौरे यांनी व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात  ओझरकर यांनी स्वंयसेवा आणि नेतृत्व गुण या विषयावर मार्गदर्शन केले. अमोल अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना संस्थेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात एस. डी. पाटील यांनी नेतृत्वगुण आणि संभाषण कौशल्य, संभाजी अहिरराव युवा केंद्रित समुदाय विकास, तांत्रिक साक्षरता यावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका यांनी स्त्री-पुरुष समानता, चैत्राम पवार यांनी पर्यावरण संतुलन आणि संवर्धन, आझादी का अमृत महोत्सव अशा अनेक विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन केले. तसेच  शिबिरात आत्म संरक्षण वर्ग, क्षेत्रभेट, योगासन सूर्य नमस्कार अशा अनेक विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर संभाजी अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे व्यवस्थापन पार पडत आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेरला खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या विद्यमाने आजपासून युवा नेतृत्व, समुदाय विकास कार्यक्रम शिबिर appeared first on पुढारी.