
पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
समाजातील अनेक गुणवंत काही ना काही करण्याची धडपड करत असताना जर त्यांना वेळोवेळी प्रेरीत केले जर अशा व्यक्ती निश्चितच उंच भरारी घेतात. हेच सामाजिक दायित्वाचे काम प्रोत्साहन फाऊंडेशनकडून होत असल्याचे प्रतिपादन आ. मंजुळा गावीत यांनी पिंपळनेर येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी केले.
प्रोत्साहन फाऊंडेशनच्या वतीने राज्यभरातील लाडशाखीय वाणी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत व शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरवसमारंभ प्रसंगी आ.गावीत बोलत होत्या. पिंपळनेर लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष जयवंत बागड हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तुळशीराम गावित, नाशिक मर्चट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अशोक सोनजे, जळगाव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, सहकार महर्षी श्रीधर कोठावदे, औरंगाबाद वाणी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी, कन्नड लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत मेणे, संभाजीराव अहिरराव उपस्थित होते. राजे संभाजी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मनोवेधक असे देशभक्तीपर गीत सादर करुन कौतुकाची थाप मिळविली. प्रसंगी गडकिल्ले अभ्यासक व ऐतिहासिक नाणी संग्राहक विजय विखरणकर यांनी जुन्या संग्रहित नाण्यांचे व विविध स्फटीक दगडांचे प्रदर्शन भरविले. तर नामपूर येथील कवयिञी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांच्या उडान या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष गिरिष वाणी शरद नेरकर,प्रदिप गहिवरे,राजेन्द्र दशपुते,प्रकाश मालपूरे,शशिकांत महालपूरे,आर एल वाणी डी,बी मालपूरे,दिपक पाटकर,भटू वाणी आदिनीही मार्गदर्शन केले. प्रदिप गहिवरे यांनी सुञसंचलन केले. राजेन्द्र दशपूते यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी असे….
भटू शंकर वाणी(नाशिक), डॉ.दत्तात्रेय दळवेलकर (पिंपळनेर), सुभाष बधान, प्रा. राहुल येवला, जितेंद्र कोठावदे, शशिकांत येवले, अनंत बोरकर, अजय वाणी, गिरीश महाजन, डॉ.प्रकाश येवले, योगेश चिंचोले, राजेश अमृतकर, आकाश महालपुरे, राजेंद्र पाटकर, चंद्रकांत शिरोडे, स्नेहा नेरकर] कलिंदी वाणी, जगदीश पुरकर, अनिल येवले, संकेत शिरोडे, रमेश महालपुरे, राजेंद्र अमृतकर, रवींद्र राणे, संदीप सोनजे रूपाली] कोठावदे, कल्पना मुसळे,कल्पना येवला, कालिंदी वाणी,शुभदा शिरोळे व रेखा कोठावदे यांचा गौरव करण्यात आला.
माणुसकीचे दर्शन घडले
उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक शाखेत अध्यापन करीत असतांना एका अध्यापकास पॅरालिसिसचा ञास जाणवू लागल्याने सात शिक्षकांनी वेळेत सहकार्य केल्याने शिक्षकास जिवनदान मिळाल्याने सात शिक्षकांनाही यावेळी गौरविण्यात आले.
हेही वाचा:
- धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक
- चवीचा इतिहास : पालक पनीर मुळात आहे ग्रामीण पदार्थ!
- ‘फॉक्सकॉन’बाबत केंद्राच्या दबावामुळेच राज्याने निर्णय घेतला :आदित्य ठाकरे
The post पिंपळनेरला प्रोत्साहन फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा appeared first on पुढारी.