
पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कै.विष्णू बुधा पवार या शेतकऱ्याचे दि.४ जून २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी हिराबाई विष्णू पवार यांनी पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे यांच्या मार्फत शासनाजवळ वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार मा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत हिराबाई विष्णू पवार यांना दोन लाख रुपये (२,००,०००) मंजूर झाले आहेत. या पाठपुराव्याकरीता कृषी विभाग साक्री येथील अधिकारी ठाकरे, सदगिर, साबळे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी पवार यांच्या घरी जाऊन निधी पवार यांच्या सुर्पूत करत सदिच्छा भेट दिली. पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे व भाजपा सरचिटणीस रामकृष्ण एखंडे, प्रमोद गांगुर्डे, शहराध्यक्ष नितीन कोतकर, पंकज भावसार, अनिल जाधव, प्रशांत कोतकर, योगेश कोठावदे, दिनेश जैन, शरद गांगुर्डे आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा:
- नगर : लग्नात घालण्यास आणलेले सोन्याचे दागिने लांबविले
- पुणे : पाणीगळती शोधण्यासाठी प्रति कि. मी. 1 लाख खर्च
- पुणे : महापालिका हद्दीतील सदनिकांसाठी मिळकत कर सवलतीसाठी करा ‘पीटी 3’ अर्ज
The post पिंपळनेर : अपघातात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मंजूर appeared first on पुढारी.