पिंपळनेर : ‘एकलव्य’तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

सानुग्रह अनुदान www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील एकलव्य निवासी केंद्रीय शाळेत निलेश दिनेश बोरसे (संशयीत मृत्यू प्रकरणी) दळुबाई गावठाण पो.टेंभा ता.साक्री येथे निलेश यांच्या कुटुंबियांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान रक्कम २ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. यावेळी आदिवासी एकता परिषद महा.राज्य सचिव डोंगरभाऊ बागुल, साक्रीचे आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख गणेश गावीत, आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय पूर्वचे युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णाबाबा पवार, ए. आ. भिल. तालुका संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकरे, टेंभाचे शशिकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश माळचे, एकलव्य शाळेचे मुख्याध्यापक चंद्रा, राईनपाडाचे खैरनार यांसह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : 'एकलव्य'तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.