पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष

कर्नाटक जल्लोष www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवित सत्ता प्राप्त केली. याबद्दल साक्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने लाडूचे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, साक्री शहर अध्यक्ष तथा मालपूरचे माजी सरपंच सचिन सोनवणे, किशोर पाटील, काँग्रेस किसान सभेचे साक्री तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खैरनार, जिल्हा महासचिव जयेश खैरनार, माजी सरचिटणीस सागर भावसार, सोशल मीडियाच्या अध्यक्ष प्रज्योत्त देसले, दिनेश देसले, धीरज भामरे, विशाल सावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कासारे येथे फटाक्यांची आतषबाजी
साक्री तालुक्यात कासारे येथे बाजारपेठेतही कर्नाटक विजयाबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तमराव देसले, कासारे ग्रामपंचायत उपसरपंच राहुल देसले, माजी सरपंच सयाजी देसले, प्रा. रावसाहेब खैरनार, सामाजिक कार्यकर्ते किशोर खैरनार, साक्री तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर भावसार, दिनेश देसले, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव जयेश खैरनार, संदीप पाटील, भाऊसाहेब पवार, संजय पवार, यादवराव पवार, हिरा वाघ, रमेश महाले, सागर वाघ, सोनू देसले, बंधू गवळे, जुबेर पिंजारी, बबलू सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष appeared first on पुढारी.