Site icon

पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बँकिंग प्रणाली कार्यशाळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख वक्ते म्हणून संदीप प्रकाश पाटील (हस्ती बँक, पिंपळनेर) हे उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर प्रा.के.आर.राऊत,प्रा.एस.एन.तोरवणे,डॉ.डी.डी.नेरकर अधिक उपस्थित होते. बँकिंग प्रणाली कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संदीप पाटील यांनी बँकेत खाते उघडण्यापासून,खात्याचे वेगवेगळे प्रकार, कर्जाच्या विविध सुविधा,बँकेची आधुनिक साधने आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना भविष्यकालीन रोजगाराच्या संध्या याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय तोरवणे यांनी केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.के.आर. राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

The post पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा appeared first on पुढारी.

Exit mobile version