पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीची स्थापना १९२२ ला झाली. या ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने २०२२-२३ हे शताब्दी वर्ष महोत्सव साजरा करण्यात आले. त्यानिमित्ताने रविवार, दि.25 येथील सभागृहात ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सरपंच व वारसांचा येथील ग्रामपंचायत सभागृहात शताब्दी सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल मंदिराचे मठाधिपती योगेश्वर देशपांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्रराव मराठे, सरपंच देविदास सोनवणे, पं.स.सदस्या पगारे, सभापती संजय ठाकरे, मा.सरपंच साहेबराव देशमुख, डॉ.एकनाथ कोरडे, मा.पं.स.सदश्य प्रकाश पाटील, विश्वनाथ कोरडे, ग्राम विकास अधिकारी एच. एन. अहिरे, योगेश बधान वासंतीबाई भोये, दत्तात्रय पवार, सोनाली पवार, मीना ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी योगेश्वर महाराज देशपांडे यांनी ग्रामस्थांना काय अपेक्षित आहे त्याला प्राथमिकता दिली पाहिजे, गावाचे सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, कलाकार सर्वांचे गौरव करण्यात यावा, गावाच्या विकासासाठी इतरही वास्तू निर्माण व्हाव्यात.असे मत व्यक्त केले. पांडुरंग सूर्यवंशी, हरीश गुजराथी,रवींद्र सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश ढोले यांनी तर आभार प्रमोद गांगुर्डे यांनी मानले.

यांचा केला सन्मान
चंद्रशेखर सूर्यवंशी,सुरेंद्र मराठे, दिपक राजपूत, सजेॅराव मराठे, हभप.योगेश्वर महाराज देशपांडे, हरिष गुजराती, विपुल गुजराती, गोविंदराव पाटील, वसंत कडू लोखंडे, सुनील धायबर, विश्वनाथ कोरडे, आशाबाई लोखंडे, ललित मराठे, श्रीकांत कोठावदे, शिलनाथ एखंडे, रत्नाकर बाविस्कर, रविंद्र सूर्यवंशी, सतिश पाटील, ज्ञानेश्वर एखंडे, कल्पना बाई पवार, नारायण पगारे, अजय सूर्यवंशी, संजय ठाकरे, योगेश नेरकर, विनोद कोठावदे, शिलनाथ एखंडे, संजय ढोले, कल्पना पवार, हारजाबाई पवार, सतिश शिरसाठ, साहेबराव देशमुख, विजय गांगुर्डे, देविदास सोनवणे, डॉ.एकनाथ कोरडे, आजी माजी सरपंचांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा :

The post पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान appeared first on पुढारी.