पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी

साक्री जैताने गाव www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे गावाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नळ पाणीपुरवठा योजना जैताणे गावासाठी मंजूर झालेली आहे. जैताणे गावापासून ९ किलोमीटर अंतरावरील बुराई माध्यम प्रकल्प या धरणातून आता जैताणे गावासाठी पाणीपुरवठा केला जाणार  आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजनेमध्ये बुराई धरणाजवळ असलेल्या अस्तित्वातील जॅकवेलपासून अशुद्ध पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घेण्यात येणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची संपूर्ण दुरुस्ती प्रस्तावित असून  केंद्रापासून ते गावापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे जैताणे गावात नवीन १ लक्ष ६ हजार लीटरचा जलकुंभ, जुन्या जल कुंभाची ३ लाख क्षमतेची दुरुस्ती करुन गावात वितरण रस्ता टाकण्यात येणार आहे. त्यासाठी ४,६२,६९,७७२/-रुपयाची बुराई पाणीपुरवठा योजना ही मुख्य जलवाहिनी, गावातील उपजलवाहिनी, नवीन पाण्याची टाकीसह जैताणे गावात कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने आ. मंजुळा गावित, तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नाने योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधीक्षक अभियंता शि.छ.निकम, जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी,  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सहअध्यक्ष, ग्रामीण पाणी पुरवठा सदस्य सचिव कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता अजय पाटील, पंचायत समिती या प्रशासकीय विभागाने योजना मंजुरीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे योजनेच्या मंजुरीसाठी सरपंच कविता अशोक मुजगे, उपसरपंच कविता राकेश शेवाळे, पं.स.सदस्या सोनाली बाजीराव पगारे, मा.पं.स.सदस्य अशोक मुजगे, गटनेते बाजीराव पगारे, गोकुळ पगारे, रमनबाई चौधरी, सायंका सोनवणे, गणेश न्याहळदे, संगीता मोरे, शाम भलकारे, राजेश बागूल, जिजाबाई न्याहळदे, अनिता जाधव, सत्तार मणियार, अश्विनी बोरसे, तनुजा जाधव, हिम्मत मोरे, समाधान महाले, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे, वसुली लिपिक योगेश बोरसे, संगणक परिचालक प्रदीप भदाणे, अनिल बागूल, रोहिदास साळुंखे यांचे प्रयत्न लाभले आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी appeared first on पुढारी.