पिंपळनेर : नाशिक अक्कलकुवा एस.टी.बसची इनोव्हाला धडक

अपघात

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री नंदुरबार रस्त्यावरील छडवेल गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील एस.टी.बसने इनोव्हा कारला धडक दिली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. तसेच चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेशभाई मोतीमाई कड़ीया (३०,रा.शक्तीनगर धनसुरा, जि. अरवली, इ.मु.आश्रय प्लॉट वडसर श्रीजजवळ वडोदरा, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरेशभाई शिंपी यांचेसह साक्रीकडे जात असताना छडवेल कोर्डे गावाजवळ समोरून येणाऱ्या एच.एच.१४/ बी.टी.२००३ नाशिक अक्कलकुवा बसने रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारला धडक दिली. या अपघातात राजेशभाई गंभीर जखमी झाले तर सोबत असलेले सुरेशभाई शिंपी यांना देखील मुक्कामार लागला व वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी छडवेल को प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले आहे. राजेशमाई यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : नाशिक अक्कलकुवा एस.टी.बसची इनोव्हाला धडक appeared first on पुढारी.