
पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात नाशिक- नंदुरबार या एसटी बसने गुजरातहून सटाणाकडे जाणाऱ्या पिकअपला धडक दिली. या अपघातात पिकअप वाहन चालक गंभीर दुखापत तर वाहनाचे नुकसान झाले आहे.
पिंपळनेर पासून जवळच असलेल्या शेलबारी घाटात एम.एच.१८डब्ल्यू २६२३ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाला नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या एम. एच ४८ एन.९०६१ या क्रमांकाच्या नाशिक-नंदुरबार बसने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास समोरुन जोरदार धडक दिली. यात पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पिकअप वाहनचालक महादू रामा गवळी (४५, रा. माळवाडा, ता. सटाणा) तसेच पवन राजेंद्र गुरव (२६, मानोद, जि. पालघर) हे दोघी जखमी झाले. अपघातानंतर शेलबारी घाटात सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पिकअप चालकास प्राथमिक उपचार करून तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी अभिमान चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बसचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे पुढील तपास करित आहेत.
हेही वाचा:
- आमदार राजळेंचा फ्लेक्स ढाकणेंच्या दारात; नागरिकांमध्ये चर्चेचा विषय
- इस्लामपूर, कासेगावात गुटखा, सुगंधी पान मसाला जप्त अन्न, औषध प्रशासनाची कारवाई
- पुणे : परिनिरीक्षण मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल
The post पिंपळनेर : बसची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी appeared first on पुढारी.