पिंपळनेर : भाजपाच्या महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा आजगे

पिंपळनेर सुवर्णा रवींद्र आजगे

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा रवींद्र आजगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता पगारे यांच्या हस्ते सुवर्णा आजगे यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. या पदी निवड झाल्याने आजगे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनसामान्यांना सुवर्णा आजगे माध्यमातून अधिकाधिक होईल असा विश्वास व्यक्त करून यांनी आजगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे आ. जयकुमार रावल, खा. डॉ सुभाष भामरे, खा. डॉ हिना गावित, आ. अमरीशभाई पटेल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी व विभाग संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील, ज्येष्ठ नेते संभाजीराव पगारे, भाजपा जिल्हा संघटन यांच्या सरचिटणीस डी. एस. गिरासे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, साक्री विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी, साक्री मंडल अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, पिंपळनेर मंडल सरचिटणीस प्रमोद गांगुर्डे, पिंपळनेर मंडल सरचिटणीस रामकृष्ण एखंडे, पिंपळनेर शहराध्यक्ष नितीन कोतकर आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : भाजपाच्या महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा आजगे appeared first on पुढारी.