
पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील गांधी चौकात चोरट्यांनी बंद घरात हातसफाई केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील कुणाल अशोक कोतकर (रा. गांधीचौक, पिंपळनेर) हे त्यांच्या परिवारासोबत बाहेरगावी गेले होते. गावातच त्यांची आई वास्तव्यास आहे. त्यामुळे मंगळवारी, दि.27 दुपारी घर व्यवस्थितरीत्या बंद केले आहे का असा संशय आल्याने कोतकर यांच्या आई चाचपणी करण्यासाठी घरी गेल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती आई यांनी मुलगा कुणाल यांना तातडीने कळविली. त्यानंतर कोतकर यांच्या तक्रारीनुसार पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांचे पथक घटनास्थळी आले. पाहणी करून पोलिस ठाण्यात चोरटंयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- बालविवाह निर्मूलनासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा
- Belgaum : वकिलांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्ग पाऊण तास ठप्प; ५ ते ६ किलोमीटर वाहनांच्या रांगा
- कोल्हापूर : सडोली दुमाला येथे बिनविरोध झालेल्या तरुण ग्रा.पं. सदस्याचे डेंग्यूने निधन
The post पिंपळनेर मध्ये चोरट्यांचा साडेसात लाख रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.