Site icon

पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेरच्या शांताई एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संस्कृती दर्शन घडवत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठी ग्रंथ पूजन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेखर बागुल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के. एन. सोनवणे, दीपाली दळवेलकर, कविता कोठावदे, प्रियंका पवार, योजना गांगुर्डे आदी उपस्थित होते. यावेळी दीपाली दळवेलकर, विशाल बेनुस्कर, शेखर बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संस्कृती दर्शन, प्रबोधनात्मक नाटिका, जात्यावरील ओव्या, गीत आदी सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवीण मोरे यांनी मार्गदर्शन केले. लावण्या लाडे व अपूर्वा अमृतकर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.

पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शाळेत आलेले विद्यार्थी. (छाया : अंबादास बेनुस्कर)

हेही वाचा:

The post पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन appeared first on पुढारी.

Exit mobile version