पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ www.pudhari.news

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांचे दर तीन वर्षांनी शैक्षणिक अंकेक्षण अर्थात ॲकॅडमिक ऑडिट करण्यात येते. या प्रक्रियेस विद्यापीठाकडून महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. ॲकॅडमिक ऑडिटमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि रोजगार विषयक भवितव्याबद्दल महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधा,अभ्यासक्रम, अभ्यासेतर उपक्रम, विद्यार्थी हिताच्या योजना अर्थात विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, युवती सभा, विविध प्रकारच्या शिष्यवृत्यांचे वाटप, परीक्षा पद्धती, विद्यार्थांचे निकाल त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून नोंदविलेला सहभाग, संशोधन, पुस्तक लेखन या सर्व बाबींचे मूल्यमापन करण्यात येते. महाविद्यालयास विद्यापीठाकडून मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आर. एन. शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र विनायक मराठे, सचिव अे. एस. बिरारीस, कॉलेज कमिटी चेअरमन धनराज राजमल जैन व पिंपळनेर एज्यू. सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य के. डी.कदम यांनी अभिनंदन केले आहे. शैक्षणिक ऑडिटसाठी माजी प्र. प्राचार्य डॉ. पी. के. अहिरे, प्र. प्राचार्य के. डी. कदम, प्रोफेसर डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाट, प्रा. डॉ. संजय खोडके, कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते, कुणाल कुवर भूपाल शिंदे हे प्रयत्नशील होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून 'अ' श्रेणी appeared first on पुढारी.