पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात गुरुवारी (दि.29) दाेनच्या सुमारास मुसळधार बरसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे पिंपळनेर शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले.

पावसामुळे रस्त्यावर जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदीनाले ओसंडले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची  धावपळ झाली. पिंपळनेरसह परिसरातील शेतात पाणी साचून जलमय परिस्थिती निर्माण झाली. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीन पीक अक्षरश: आडवे झाले आहे. संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मका, कांदा रोपाचेही नुकसान झाल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत सापडला आहे. परिसरातील पिकांचे पंचनामे त्वरित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरु लागली  आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती appeared first on पुढारी.