पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे मंगळवारी, दि. 22 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन करीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तीव्र आंदोलन करण्याचा असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर वाघ, तालुका प्रमुख पंकज मराठे, उपतालुका प्रमुख तुषार गवळी, हिंमत सोनवणे, अनिल शिरसाट, शहर उपप्रमुख बाळा शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नितीन पं. स. सदस्य पिंटू देसले, ज्येष्ठ शिवसैनिक पंजाब गांगुर्डे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नितीन गायकवाड, तालुका समन्वयक केशव शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज गवळी, विभाग प्रमुख हर्षल सोनवणे, पप्पू माळी, अजय जाधव, नितीन गुप्ता आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे appeared first on पुढारी.