पिंपळनेर : साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
आरोग्यदायी पर्यावरण हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे. सर्व जण पर्यावरण मित्र झाले तर ग्राहक सक्षमीकरण होणार. निसर्गाचा र्‍हास झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मींग,वातावरणीय बदल,अल निनो, नवनवीन आजार,प्रदुषण अशा विविध जागतिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वांनी इको-फ्रेंडली आयुष्य जगावे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रचार,प्रसार व प्रबोधनासाठी आपण सा-या ग्राहकांनी प्रयत्न करणे,काळाची गरज आहे,असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभाग अध्यक्ष डाॅ.अजय सोनवणे यांनी केले.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण विभाग तहसील कार्यालय साक्री,यांनी आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात,यंदाच्या जागतिक ग्राहक दिनाची थीम असलेल्या “पर्यावरण पुरक ऊर्जेच्या तथा स्वच्छ उर्जा संक्रमणाच्या माध्यमातून ग्राहकांचे सक्षमीकरण,या विषयानुशंगाने प्रमुख मार्गदर्शन म्हणून,ग्राहक पंचायतीचे विभागीय अध्यक्ष डाॅ.अजय सोनवणे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान हे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून,ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभाग अध्यक्ष डाॅ.अजय सोनवणे , जिल्हाध्यक्ष ॲड. जे. टी.देसले,जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंदा दाणेज,साक्रीच्या तहसीलदार आशाताई गांगुर्डे, साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख,जिल्हा सहसंघटक पी झेड कुवर, तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम.भामरें,निवासी नायब तहसीलदार राहुल मोरे,गोपाळ पाटील,साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ पारख,ग्रा.पं चे.तालुका सचिव विलास देसले,सहसंघटक प्राचार्य डाॅ.राजेंद्र आहिरे,सदस्य अनिल अहिरे, ए.पी.दशपूते,सुहास सोनवणे, तालुका पुरवठा विभागाचे विनायक कोळी आदि उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष ॲड.जे.टी.देसले यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील 2019 च्या महत्वाच्या सुधारीत कलमाचा उल्लेख करतांना सांगितले की, या कायद्याने ज्या एखाद्या उत्पादनाची खोटी जाहिरात जे कुणी सेलिब्रेटिज करत असतील तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करता येणार आहे असे नमूद करत, यामुळे मात्र खोट्या जाहिराती आता बंद झाल्याचे समाधान व्यक्त करत ही आपल्या कायद्याची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. तसेच बॅंकेच्या सीबील स्कोअरचा कर्ज वितरणावेळी होत असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन करून वस्तूंच्या खरेदी प्रसंगीच्या गॅरंटी वाॅरंटीतील भेद लक्षात घेत तशा पद्धतीची पावती सजग ग्राहक म्हणून आपण घेण्याचे आवाहन केले. आयोजकांनी आभार मानले. साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम.भामरें यांनी ग्राहक पंचायतीच्या स्थापनेसाठी व ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यासाठी बिंदू माधव जोशींनी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास मांडत , आपल्या ग्राहक पंचायतीच्या चळवळीच्या माध्यमातून बिंदू माधव जोशींनी देशाच्या शोषण मुक्तीचे स्वप्न कसे पाहिले होते याचा लेखाजोखा मांडला, तेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी या चळवळीचे साधक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. पी.झेड् कुवर यांनी प्रास्ताविक केले. अनिल अहिरे यांनी सुत्रसंचालन केले. राहुल मोरे यांनी आभार केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाळ पाटील, राहुल मोरे, विनायक कोळी व चाळसे आदींनी परिश्रम घेतले.

The post पिंपळनेर : साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती appeared first on पुढारी.