
पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
साक्री शहर लवकरच सौर दिव्यांनी उजळणार आहे. खा. डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नाने नावीन्यपूर्ण योजनेतून सौर दिव्यांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल साक्री नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी खा. डॉ. हीना गावित यांचे आभार मानले आहेत.
साक्री नगरपंचायतीवर अनेक वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून विकासकामांवर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून साक्री शहरातील विकासकामांना चालना मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हीना गावित यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साक्री शहरासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून संपूर्ण साक्री शहरात सौर दिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी जयश्री पवार यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. सौर दिव्यांमुळे साक्री शहरात विकासाचा लख्ख प्रकाश पडायला सुरुवात होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या सर्व नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
- नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
- Pak Inflation : कंगाल पाकिस्तानला IMF चा सल्ला; ‘श्रीमंतांची कर चुकवेगिरी थांबवा’
- माझा घातपात घडविण्याचे कारस्थान; अशोक चव्हाण यांच्या तक्रारीमुळे खळबळ
The post पिंपळनेर : साक्री शहर सौर दिव्यांनी उजळणार appeared first on पुढारी.