
पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरारी असलेले सरपंच व ग्रामसेवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता.
जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ बबल्या विश्वास सोनवणे यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर झालेल्या रक्कमेतून १३ लाख ३३ हजार रुपये, पेसा निधीतून बारा लाख २७ हजार रुपये, ग्रामनिधीतून ५६ हजार ५५० रुपये, जैवविविधा निधीतून १९ हजार ५०० रुपये असा एकूण २६ लाख ३६ हजार ५० रूपये जनतेच्या फायद्यासाठी न वापरता दोघांनी युनियन बँकेच्या पिंपळनेर शाखेतून परस्पर काढून घेतले होते. याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे तत्कालिन विस्तार अधिकारी अमृत पंडित महाले यांनी १३ ऑगस्ट २०२० ला पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली. तेव्हापासून दोघे आरोपी फरारी होते. त्यांचा पिंपळनेर पोलिस कसून शोध घेतला. अखेर तब्बल दोन वर्षांनी पोलिसांना त्यांना शोधून अटक करण्यात यश आले आहे. त्यांना सोमवार (दि.26) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा:
- Virat Gifted his Jersey : कसोटी सामन्यातील विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृतीने सारेच भारावले…
- जालना : शॉर्टसर्किटने ८ एकर ऊस जळून खाक, महावितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
- Tunisha Sharma Death : ‘तुनिषा होती गर्भवती; शीझान खानने लग्नाला दिला नकार’, मैत्रिण तनेजाचा दावा
The post पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.