पिकअप-कंटेनरची जोरदार धडक; दोघे तरुण ठार, मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात

वाडीवऱ्हे (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला फाट्याजवळील महाले पेट्रोलपंपासमोर झालेल्या अपघातात दोन ठार झाले. धडक इतकी भीषण होती, की पिक-अपचा चक्काचूर झाला. त्यात पिक-अपसह दोघे अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यास क्रेनची मदत घ्यावी लागली.

पिक-अपचा चक्काचूर

सोमवारी (ता. ८) पहाटे अडीचच्या सुमारास जळगावकडून भाजीपाला घेऊन महिंद्रा पिकअप (एमएच-१९-सी-वाय-६४४९) मुंबईकडे भरधाव जात होते. गोंदे दुमालाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच-०४-एलडी-५१२२)पिक-अपने पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमींना तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकजण जागीच ठार झाला.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

अपघाताचा गुन्हा दाखल

राहुल ज्ञानेश्वर खडसे (२२), अतुल सुरेश बिराडे (२३, रा. उमाडा, ता. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर