पिसाळलेल्या म्हशीचा हुडदुंग! चोरट्यांनी साधली संधी; चिमुकल्यासह तीन जखमी 

नाशिक : मंगळवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास दहीपूल आणि मेन रोड परिसरात अचानक नागरिकांची धावपळ उडाली. पिसाळलेली म्हैस सराफ बाजारातून दहीपूल परिसरात आली. नागरिकांची धावपळ आणि किंचाळ्यांनी ती आणखी बिथरली. पुढे....
 

फारूख सय्यद देवदूतसारखा धावला.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दहीपूल आणि मेन रोड परिसरात अचानक नागरिकांची धावपळ उडाली. पिसाळलेली म्हैस सराफ बाजारातून दहीपूल परिसरात आली. नागरिकांची धावपळ आणि किंचाळ्यांनी ती आणखी बिथरली. ती अभिजित शहा यांच्या कपड्याच्या दुकानात शिरली. काउंटर आणि शोकेशची काच फोडली. दुकानातील कामगार महिलेच्या दिशेने जात असताना, दुकानाबाहेर अंगठी विक्री करणारा फारूख सय्यद याने धाडस करून शिंगे धरून म्हशीला दुकानाबाहेर काढले. त्याच्या पाठीस शिंग लागल्याने तो जखमी झाला. मात्र दुकानमालक आणि कामगार महिलांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. आमच्यासाठी फारूख देवदूत ठरल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. नंतर ठाकरे रोडच्या दिशेने जाताना गाडगे महाराज पुतळा परिसरात एक चिमुकल्यासह अन्य तिघांना म्हशीने जखमी केले. यामुळे परिसरात धावपळ उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचा जीव मुठीत आला. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

...अन् डाव साधला 
नागरिकांना जखमी करणारी म्हशीस चौघांनी दोर बांधून नेले. त्यांनी म्हैशीला पकडून चांगले काम केल्याचे नागरिकांना वाटले. मात्र काही वेळेनंतर कळाले, की त्यानी सर्वांसमोरून म्हशीला चोरून नेले. एका तरुणाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी अन्य एकाचे नाव सांगितले. मात्र, म्हैस गेली कुठे हा प्रश्‍न अनुत्तीर्ण राहिला. मोकाट जनावरे पकडणारे महापालिकेचे पथकही तेथे दाखल झाले. त्यांना तेथे काहीच सुचले नाही. शेवटी तेही रिकाम्या हाती परतले. उशिरापर्यंत पोलिस म्हशीचा शोध घेत होते. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

बिथरलेली म्हैस महिलांच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आल्याने तिला प्रतिकार केला असता तिने शिंग मारल्याने पाठीस दुखापत झाली. दुखापतचे काही वाटत नाही. महिलांना वाचवू शकलो, याचे समाधान वाटत आहे. -फारूख सय्यद, जखमी युवक  

मेन रोड बाजारपेठेत अचानक धावपळ; पिसाळली म्हैस

 बिथरलेल्या म्हशीने मंगळवारी (ता. १२) मेन रोड, दहीपूलसारख्या मुख्य बाजारपेठेत हुडदुंग माजविला. कपड्याच्या दुकानात घुसून मोठे नुकसान केले. दुकानात काम करणाऱ्या महिलांसाठी फारूख सय्यद देवदूतसारखा धावून आला. त्याने शिंग धरून म्हशीला लोटल्याने ती दुकानातून बाहेर पडून मेन रोडच्या दिशेने गेली. त्यामुळे चारही महिला बचावल्या. मात्र, फारूख जखमी झाला.