पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लूट 

दिंडोरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारातील नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील मातोश्री पेट्रोलपंपावर 3 दरोडेखोरानी पिस्तूल व लोखंडी रॉडचा धाक दाखवून 28 हजारांची रोकड व दोन मोबाइल असे एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज लुटला. सोमवारी (दि. 23) रात्री पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे येथील मातोश्री पेट्रोलपंपावर 23 ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास 20 ते 25 वयोगटातील तीन तरुण पंपावर आले. ड्यूटीवर असलेले गणपत चौधरी व कांतीलाल राऊत या कर्मचाऱ्यांना पिस्तूल व लोखंडी रॉडचा धाक दाखवून मारहाण केली व पेट्रोलपंपाजवळील लॉक नसलेल्या केबिनच्या दरवाजातून आत प्रवेश केला. टेबलच्या ड्रॉवरमध्ये असलेली 28 हजारांची रोकड व दोन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाइल घेऊन पलायन केले. याबाबत तिघांविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनिरीक्षक कैलास देशमुख, पोलिस हवालदार मुंडे आदी पुढील तपास करत आहेत.

The post पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लूट  appeared first on पुढारी.