पिस्तूल, तीन काडतुसांसह एकास नाशिक रोडला अटक; गुन्हे शाखेतर्फे कारवाई 

नाशिक रोड : हॉटेल साईराजमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील एकास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले. काय घडले नेमके?

गुन्हे शाखेने रचला सापळा

हॉटेल साईराजमध्ये एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे, हवालदार सानप, घुमरे, महाजन, माळेदे, शिंदे, साळुंखे यांनी हॉटेल साईराज या ठिकाणी पाळत ठेवली. एक संशयित व्यक्ती आढळून आली. त्यास ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव म्हातारदेव ऊर्फ सुनील कैलास खरमाटे (वय ३३, रा. पिंपळगाव टप्पा, ता. पाथर्डी, जि. नगर) असे सांगितले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळली.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या ताब्यात

ती विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व त्याच्या ताब्यातील कार असा सुमारे पाच लाख ३५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यास नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश