मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या सक्रिय पदाधिकार्यांच्या मागावर आहे. त्यातूनच शहरातील एकाला रविवारी (दि. 13) भल्या पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पाच – सहा तास चौकशी केल्यानंतर पुढील चौकशीसाठी सोमवारी (दि.14) एनआयएच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावून त्याला मुक्त करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा भागातील रहिवासी टेलर गुफरान खान याच्या घरी एनआयएच्या पथकाने रविवारी पहाटे धाड टाकली. घरातील कागदपत्रे आदींची झडती घेतानाच साधारण तीन-चार तास चौकशी झाली. तेथून त्याला शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी सुमारे पाच तास उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर मुंबईतील एनआयए कार्यालयात चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावून त्याला सोडण्यात आले. या कारवाईविषयी अधिकृतरीत्या कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, यापूर्वीदेखील शहरातून पीएफआयचे माजी अध्यक्ष मो. इरफान दौलत नदवी आणि रशीद शहीद एकबाल यांना अटक झालेली होती. गुफरान हादेखील या संघटनेशी संबंधित असल्याचा संशय असून, त्या आधारे चौकशी होत आहे.
हेही वाचा :
- भिगवण : 52 वर्षांनी जागे झालेल्या वन विभागाने क्षणात केले भूमिहीन
- आजचे राशिभविष्य (दि. १४ ऑगस्ट २०२३)
The post पीएफआय'शी कथित संबधांतून मालेगावी एकाची चौकशी appeared first on पुढारी.