”पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल”; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

नाशिक : चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. आज चित्रा वाघ नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला. काय म्हणाल्या चित्रा वाघ...

पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल - चित्रा वाघ

वनमंत्री संजय राठोड विरोधात पुरावे असतांना सरकार का कारवाई करत नाही ? अजूनही FIR का नाही ? पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस प्रशासन, बलात्काऱ्याला वाचवतेय. अश्या मंत्र्याला वाचवणारं हे बहाद्दर सरकार आहे असे आरोप चित्रा वाघ यांनी केले आहेत. अरुण राठोडच्या जबाबात, संजय राठोडचं नाव असून पोलिसांच्या 100 नंबरवर हा कॉल रेकॉर्ड आहे. पूजा चव्हाणच्या मोबाईल वरती, संजय राठोड यांचे 45 मिस्ड कॉल आहेत असा दावा वाघ यांनी केला

मिस्ड कॉल मधील संजय राठोड कोण?
हा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून मिस्ड कॉल मधील संजय राठोड कोण ? पोलीस याचे उत्तर का देत नाही? पोलिसांच्या कंट्रोल रूम मधील महिला पोलिसाने अरुण राठोडला एक नंबर दिला.अरुण राठोडने या नंबर ला फोन करून सर्व माहिती दिली. या नंबर वाल्यानं, एका व्यक्तीला कॉन्फरन्समध्ये घेऊन पुन्हा अरुण राठोडला माहिती सांगायला लावली. हा नंबर धारक आणी कॉन्फरन्स मधील दुसरा माणूस कोण ? पुणे कंट्रोलनं हा नंबर का दिला ? हा नंबर कोणाचा ? असे अनेक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.

गर्दी गोळा केली म्हणून निर्दोष होतात का ?

पोहरादेवीच्या यात्रेला संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केले तर गर्दी गोळा केली म्हणून निर्दोष होतात का ? आम्हाला धमक्या देण्याऐवजी आरोप खोटे असतील तर पोलिसांनी सिद्ध करून दाखवावे

मग त्या डॉक्टरची चौकशी केली का?,

'यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पुजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलले, त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पुजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पुजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का?, असा प्रश्न मी एसपींनी केला त्या वर त्यांनी सांगितलं की पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही,' असा दावाही त्यांनी केला आहे.

धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्मा फिरली
धनंजय मुंडे प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करायची मागणी केली. परंतु अद्यापही गुन्हा दाखल का नाही केला ? आरोप खरे सिध्द झाले तर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी हत्यारा बसला तर हे नामर्द सरकार आहे.असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांबद्दल आदर असून अशा मंत्र्याला हाकलून लावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे,