पुणे विद्यापीठाच्‍या १० एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा; मार्गदर्शक तत्त्वे जारी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्‍या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्‍या नियमित, अनुशेषित व रिपिटर परीक्षांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे विद्यापीठाने जारी केली आहेत. त्‍यानुसार येत्‍या शनिवार (ता. १०)पासून ऑनलाइन स्‍वरूपात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. बहुपर्यायी वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न परीक्षेत विचारले जातील. 

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे नियमित अध्ययन प्रक्रियेसोबतच परीक्षा प्रक्रियाही प्रभावित झाली आहे. गेल्‍या वर्षी कोरोनाच्‍या फैलावामुळे पुणे विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्‍या परीक्षा घेतल्‍या होत्‍या. परंतु ऑक्‍टोबर- नोव्‍हेंबर २०२० सत्रातील (नियोजित एप्रिल-मे २०२१) परीक्षांमध्ये प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्‍या नियमित, अनुशेषित व रिपिटर परीक्षांचे नियोजन ऑनलाइन पद्धतीने १० एप्रिलपासून केले आहे. विद्यापीठाने जारी केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना आपापल्‍या गॅझेटद्वारे ही परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्‍यान, परिपत्रकात तसा स्‍पष्ट उल्‍लेख मात्र केलेला नाही. 

परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर टप्प्याटप्प्‍याने प्रसिद्ध केले जात आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस, ई- मेलद्वारे या संदर्भातील माहिती कळविण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्‍वित असणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्‍यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही जतन होऊन खंड पडल्‍यास तेथून परीक्षा पुन्‍हा सुरू होईल. परीक्षेदरम्‍यान काही अडचणी असल्‍यास ०२० ७१५३०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

एक तासाची परीक्षा; पन्नास गुणसाठी साठ प्रश्‍न 

या परीक्षा फक्‍त ऑनलाइन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्‍वरूपाच्‍या असतील. परीक्षेत पन्नास गुणांसाठी साठ प्रश्‍न विचारले जातील. यापैकी पन्नास प्रश्‍नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील. परीक्षेसाठी साठ मिनिटे अर्थात, एक तासाचा कालावधी असेल. दिव्‍यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी व सवलती देय राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्‍त वीस मिनिटे वेळ दिला जाईल. 

सराव परीक्षा देण्याची संधी 

ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी परीक्षेमधील नमुना प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षांचे (मॉपअप टेस्‍ट) आयोजन केले आहे. मुख्य परीक्षेपूर्वी सोमवार (ता.५)पासून शुक्रवार (ता.९)दरम्‍यान सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत ही सराव परीक्षा घेतली जाईल. तर वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना सर्व विषयांत मिळालेले गुण परीक्षेनंतर ४८ तासांत स्‍टुडंट प्रोफाईल सिस्टिममध्ये उपलब्‍ध केले जातील. त्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील ४८ तासांत अडचणी किंवा शंका असल्‍यास यासंदर्भात तक्रार नोंदविण्याची संधी दिली जाईल. स्‍टुडंट प्रोफाइल सिस्टिममध्ये नोंदविलेल्‍या तक्रारी ग्राह्य धरल्‍या जातील. प्रत्‍येक विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा पूर्ण केल्‍याची पोच दिसेल. या बाबीचा स्‍क्रीनशॉट, फोटो, प्रिंट विद्यार्थ्यांनी आपल्‍याकडे जतन करून ठेवणे आवश्‍यक असल्‍याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी sppuexam.in या संकेतस्‍थळाचा वापर करावा. परीक्षांबाबत सूचना, उपयोगकर्ता पुस्‍तिका, व्‍हिडिओ याच संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असतील, असेही नमूद केले आहे.  

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप