पुण्यातील वृद्धेचा खुनी नाशिक रोडला जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

नाशिक : आळे फाटा परिसरात साठ वर्षांच्या वृद्धेचा खून करून फरार असलेल्या परप्रांतीय संशयिताच्या मुसक्या आवळण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.  शनिवारी (ता. ५) नाशिक रोडला रेल्वे पोलिसांनी सापळा लावून संशयिताला पकडले.

बिहारला पळून जाण्याची तयारीत

पुणे ग्रामीण आळे फाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानकाबाई अर्जुन चौरे  (वय ६०,  वेशीजवळ, आळे फाटा, पुणे) या महिलेचा खून करून फरार झालेला संशयित अर्जुन शुभनारायण प्रसाद (वय २७, मूळ गौळाजी, छापरा बिहार,  हल्ली मुक्काम‌ साकोरी, जि. पुणे) हा  संशयित  रेल्वेने मूळ गावी पळून जाणार असल्याची माहिती पुणे एलसीबीकडून नाशिक रोड रेल्वे  पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिस ठाण्यातील  सहाय्यक निरीक्षक  विष्णू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस हवालदार संतोष उफाडे, उबाळे, शिपाई महेश सावंत यांच्या पथकाने नाशिक रोड  रेल्वे ठाण्याच्या आवारात शोध घेत दुपारी तीनला नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर  तोंडास मास्क बांधलेल्या संशयिताला पोलिस हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे यांनी चौकशी करीत पोलिस ठाण्यात आणून संशयिताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे, चंद्रकात उबाळे, पोलिस शिपाई महेश सावंत यांनी कामगिरी बजावली.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच