नाशिक : लॉकडाऊन करणार नाही, करायचा असेल त्यावेळी आधी तीन दिवस लोकांना माहिती दिली जाईल. तसेच महापालिकेत बेड मिळाला नाही म्हणून महापालिकेवर मोर्चा काढावा लागलेल्या घटनेची पोलिस चौकशी होईल. त्यात, बेड देण्यात टाळाटाळा केल्याचे निष्पष्ण झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असतांना नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अन्यथा लाॅकडाउन शिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा भुजबळ यांनी 26 मार्चला झालेल्या बैठकीत दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागून होते.
भुजबळ म्हणाले की..
- खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
- होम क्वारंटाईन रुग्ण शोधून काढले पाहिजे
- 228 पैकी 14 बेड वापरले जातात त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा.
- 300 बेड सिव्हिलमध्ये तयार करायला सांगितले
- नाशिक महापालिका, बिटको रुग्णालयात खाटा वाढवून 5 दिवसात 1 हजार बेडची सोय करावी
- मविप्र बेड मिळणार आहे बिटको रुग्णालयात जुन्या कोर्टाच्या इमारतीत सोय करता येईल का हे पहिले जाईल
- होम क्वारटाईन रुग्णाची माहिती घ्यावी
-कलेक्टर, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त रोज अर्धा दिवस रस्त्यावर काम करणार
- बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढवायला सांगितले.
- जिथे बेड असतील तेथे रुग्णांना जावे लागले, पण बेड असून दिले नाही तर कारवाई होईल
- महापालिकेत बेडसाठी आंदोलन करण्याची वेळ आलेल्या मृत रुग्णाला कुणी बेड नाकारले त्याची चॉकशी होईल रुग्णाला बेड देण्यात टाळाटाळ केली असल्यास त्यांची चौकशी होईल
- 3 दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आढावा घेणार
हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी
भुजबळ ही हतबल
महापालिकेचा होम क्वारँटाईनचे अपयश, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी, आणि बेड अभावी मृत्युबाबत पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तशाच तक्रारी आहेत. पत्रकारांप्रमाणेच माझेही मत आहे. काही आधिकारी काम करीत नाही असं माझे ही मत आहे. पण तरीही ३ दिवस वाट पाहून मी निर्णय घेईल. महापालिकेच्या कामकाजाविषयी पालकमंत्री भुजबळ यांची आगतिकता आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट दिसली. दोन वेळा पत्रकाराशी बोलताना त्यांनी हतबलता व्यक्त केली.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडे, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनच्या सहायक आयुक्त डॉ.माधुरी पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड