पूजा तेलंग यांचा शिंदे गटात प्रवेश 

POOJA TELANG www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी परिसरातील छावा क्रांतिवीर संघटनेच्या युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष आणि शंभो नारायण ग्रुपचे संस्थापक शिवा तेलंग यांच्या पत्नी पूजा तेलंग यांनी नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पूजा तेलंग येथून मनपा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे महिला जागेसाठी असणारी चुरस बघता ही राजकीय ॲडजेस्टमेंट केली असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा या भागातील राजकीय समीकरणांचा गुंता वाढला आहे.

हेही वाचा:

The post पूजा तेलंग यांचा शिंदे गटात प्रवेश  appeared first on पुढारी.