पैशांपुढे जीव ठरला कवडीमोल! उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू 

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभम गणपत कातोरे हा तरुण दुसऱ्या पाळीत काम करून वाडीवऱ्हे येथे दुचाकीवरून घरी येत होता. दरम्यान, विल्होळीजवळील जैन मंदिरासमोरील पोलिस चौकीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने तो जखमी झाला. रात्रीची वेळ असल्याने त्याला दीड तास वैद्यकीय मदत मिळाली नाही.

कुटुंबीय पैसे भरु शकले नाहीत 

घरातील माणसांनी पाथर्डी फाट्यावरील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता एक लाख रुपये अनामत रक्कम भरा, तरच दाखल करता येईल, असे सांगितले. नातेवाइकांनी सकाळी पैसे भरू, अशी विनंती केली. परंतु, ऐकले नाही. दुसरीकडे उपचारासाठी नेताना वेळ गेला. वेळवर औषधोपचार न मिळाल्याने शुभमचा मृत्यू झाला. पैशाचा आग्रह न धरता रुग्णालयात दाखल करून उपचार करावे, असे शासनाचे धोरण असताना नियमाचे पालन न करणाऱ्या या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा