
जळगाव- चोपडा शहराजवळील धनवाडी रस्त्यावर शेतात राहणाऱ्या बारेला कुटुंबातील पती-पत्नी यांच्यात झालेल्या पैशाच्या वादातून वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून पत्नीचा खून केला. या प्रकरणी चोपडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरा जवळील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनवाडी रस्त्यावर कैलास सुखदेव पाटील राहणार आव्हाने जिल्हा जळगाव यांचे शेत आहे. यांच्या शेतात शेतमजूर म्हणून मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील बारेला कुटुंब वास्तव्याला होते. मंगळवारी शेतमजूर रेखाबाई दूरसिंग बारेला व तिचा पती संशयित दुरसिंग टेटीया बारेला यांच्यात पैसे मागितल्याच्या कारणावरून भांडण झाले. भांडण विकोपाला जाऊन रागाच्या भरात दूरसिंग बारेला याने पत्नी रेखाबाईच्या डोक्यात लाकडी दांड्याने डोक्यात तोंडावर डाव्या हनुवटीवर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर बरीच मारहाण करून ठार मारले. संशयित आरोपी दूरसिंग बारीला हा तिथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदलवारकर व अन्य अधिकारी फॉरेन्सिक टीम श्वानपथक एलसीबी चे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा :
- पाकिस्तान कंगाल होण्यास भारत नव्हे, देशातील लष्करच जबाबदार : नवाज शरीफ
- बालभारतीच्या पुस्तकांत आता कळणार विविध योजना !
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २० डिसेंबर २०२३
The post पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून appeared first on पुढारी.