पॉझिटिव्ह भुजबळांमुळे अनेकांच्या पोटात गोळा! विवाह, आढावा बैठकापासून साहित्य संमेलन नियोजनाला हजेरी 

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पॉझीटीव्ह असल्याचे जाहीर करीत, त्यांच्या संर्पकात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्याचे आवाहान केले आहे. भुजबळ यांना कोरोनाची लागन झाल्याचे पुढे आल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. दरम्यान भुजबळ यांना उपचारासाठी मुंबईला रवाना झाले असून सौम्य लक्षण आढळल्याने त्यांची चाचणी केली असता, त्यांना कोरोना असल्याचे निष्पण झाले. 

भुजबळ यांना सैम्य त्रास जाणवू लागल्याने त्यांची चाचणी केली असता, त्यांना कोरोना असल्याचे निष्पण झाल्याचे महापालिकेचे वैद्यकिय आधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी सांगिले. त्यानंतर ते  दुपारी मुंबईला रवाना झाले. मुंबईत कोरोना उपचाराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. 

दिवसभर कार्यक्रमांना हजेरी

भुजबळ यांनी रविवारी (ता.२१) आमदार सरोज आहिरे यांच्या विवाहाला उपस्थिती लावली पाठोपाठ नाशिकच्या नियोजित ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर भुजबळ फार्मवर जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतली. या सगळ्या दिवसभराच्या त्यांच्या भरगच्च कार्यक्रमात अनेकांचा सहभाग राहिला. त्यानंतर बारा तासातच त्यांना कोरोना झाल्याचे जाहीर झाल्याने त्यांच्या बैठकांना उपस्थित असलेल्यापासून बंदोबस्तावरील पोलिसांपर्यत सगळ्यांच्या पोटात गोळा आला आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी आज सकाळी आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर करीत, त्यांच्या संर्पकात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्याचे तसेच कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहान केले आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सगळ्यांना धास्ती 

रविवारच्या दिवसभराच्या कार्यक्रमात विवाहापासून तर कोरोना आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेपर्यत सगळ्यांच कार्यक्रमांना लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे विवाहातील त्यांच्यासोबत वावरणाऱ्या नेत्यापासून तर आढावा बैठकीत प्रशासकीय आधिकारी आणि साहित्य संमेलनाच्या तयारीतील आयोजकांपर्यत त्यांच्या पुढे मागे करणाऱ्या प्रत्येकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्या संर्पकात आलेल्यांचे चित्त विचलित झाले आहे. 

भुजबळांचे आवाहान 

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. 
-छगन भुजबळ (पालकमंत्री नाशिक)   

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय