जळगाव : पुढारी वृत्तसेवा – पॉलिसी वडिलांचे नावे होती. त्यामुळे पॉलीसीची रक्कम परत देण्याच्या नावाखाली रेल्वे नोकरी करणाऱ्या इसमाची दहा लाख ७४१९४ रुपयाला ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील तुलसीनगर येथे राहणारा प्रसाद किशोर कुलकर्णी हा रेल्वेत नोकरीला आहे. दि.८ मार्च २०२४ रोजी भालचंद्र व रामचरण यांनी मोबाईलवर संपर्क साधून तुमच्या वडिलांचे नावे पॉलिसीची रक्कम परत द्यायची आहे. असे सांगून काही कागदपत्र मागविले. प्रसाद कुलकर्णी यांनी विश्वास संपादन करून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन १० लाख ७४ हजार १९४ सुपूर्त केले. मात्र पॉलिसीची रक्कम कोणत्याही पद्धतीने त्यांना परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.२०) जून रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भालचंद्र आणि रामचरण नाव सांगणारे अज्ञात दोन मोबाईल धारकांवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.
हेही वाचा: