पोटाची खळगी नाही तर वाचनासाठी सर्व काही… 

वाचन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धावपळीच्या युगातील जीवन गतिमान झाले असून अनंत कामाचा घबडघा पाठीशी लावून घेतल्याचे स्पर्धात्मक चित्र दिसून येत आहे. परंतु या कामाच्या व्यापामधूनही काही क्षण राखून वाचनाचा छंद जोपासणाऱ्या भंगार वेचणाऱ्या दोन वाचनप्रेमींना पाहून तुम्हालाही वाचनाची प्रेरणा मिळाल्यापासून राहणार नाही.

अरे…कामे खूप आहे त्यामुळे वेळ कमी पडतो आहे. अशा विविध सबबीखाली बरेच लोक वाचनाला पारखे झाले आहेत. वाचायला त्यांच्याकडे पुरेसा वेळ शिल्लक नाही. वाचनाचा कंटाळा येतो म्हणून बरेच लोक वाचनच करत नाहीत. मात्र अशोकस्तंभ परिसरातील प्लास्टिक बाटल्या, कागद असे भंगार वेचणाऱ्या दोन भगिनी भंगार वेचून झाल्यावर नित्यनियमाने आपला वाचनाचा छंद जोपासताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून जे काही भंगार सापडेल ते गोळा करून पोटापाण्यासाठी उदरनिर्वाह करणाऱ्या या दोन्ही महिला मात्र रोज पेपर वाचन करणे काही सोडत नाहीत. मग तो पेपर जुना, मळकटलेला, अर्धवट फाटलेला का असेना. त्यासाठी त्यांनी अशोकस्तंभ येथील निवांत जागा देखील शोधून ठेवली असून येथे त्या वाचनाची भूक भागवत आहेत.

हेही वाचा:

The post पोटाची खळगी नाही तर वाचनासाठी सर्व काही...  appeared first on पुढारी.