पोटात सहा महिन्यांचा गर्भ अन् महिलेने उचलले टोकाचे पाऊल; संपूर्ण परिसर हादरला

नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) आवारात असलेल्या कर्मचारी वसाहतीत घडला धक्कादायक प्रकार. कोणी घरी नसतांनाच पाच ते सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेने उचलले टोकाचे पाऊल. मागचा पुढचा विचार न करता केले असे काही की संपूर्ण परिसर हादरला. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र गोपीनाथ दिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घरी कोणीही नसताना पल्लवी प्रमोद गायकवाड (वय 30) या महिलेने धक्कादायक पाऊल उचलले. घराच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली. सायंकाळच्या सुमारास आत्महत्येची घटना समोर आली. दरम्यान, ही महिला पाच ते सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

'एमपीए'चे कार्यक्षेत्र खूप मोठे असून, अनेक कर्मचारी तिथे आवारातील इमारतींमध्ये वास्तव्यास आहे. या महिलेचे पालक सुद्धा 'एमपीए'मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. दरम्यान, 'एमपीए'त काही महिन्यांपूर्वी देखील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क