पोलिसांचा संशय अखेर खरा ठरलाच; कारची डिक्की खोलताच झाला खुलासा

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरुन शिंदे गाव टोलनाक्याकडे अल्टो कार (एमएच 15 अेएच 6353) जात होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तसा साफळाही रचला होता. अन् तसेच घडले. गाडीची डिक्की खोलताच सापडले घबाड. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

करण दीपक बत्ताषे, (२२, प्रगती सोसायटी, रो-हाऊस, ट्रॅक्टर हाऊस मागे, द्वारका), अक्षय रविंद्र लोंढे (२५, लोंढे गल्ली भद्रकाली), साहील सुनिल बागडे (१९, मंदिराजवळ, सिन्नर), अशी संशयितांची नावे आहे. गुप्त माहीती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गाव टोलनाक्यावर सापळा लावून अल्टो कार अडविली. त्यात संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत तपासणी केली असता कारच्या डिक्कीत ३० हजार ६०० रुपयांचा नायलॉन मांजासह ५१ गट्टू मिळाले. तसेच, संशयित लोंढे याने घरी नायलॉन मांजाचा आणखी एक बॉक्स काढून दिला. शहर-जिल्ह्यात बंदी असलेला नायलॉन मांजा अल्टो कारमधून वाहतूक करण्याऱ्या या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

संशयिताविरोधात गुन्हा दाखल

पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे, पोलीस नाईक विशाल काठे, दिलीप मोंढे, फैयाज सैयद, आसिफ तांबोळी, प्रवीण चव्हाण, गौरव खांडरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांनी नायलॉन मांजा मुंबई येथील एस. एस. पतंग या व्यापाऱ्याकडून मागविलेला असल्याचे सांगितले. याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार