पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक :  जुने नाशिक परिसरातील सराईत गुन्हेगार योगेश हिवाळे  या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान योगेशचा आत्महत्येपुर्वीचा व्हिडिओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगीतले असून त्यामुळे  परिसरात एकच खळबळ उडाली... 

योगेश सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहे. यापूर्वीही त्यास तडीपार करण्यात आले होते. त्याने ती रद्द करुन आणली होती. त्यानंतरही त्याने गुन्हे करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्ताना पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यास नोटीसही बजावण्यात आल्याचे पोलिसानी सांगीतले. 

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केलेल्या या एक मिनीटाच्या व्हिडिओमध्ये योगेशने  "मी योगेश धुराजी हिवाळे.. मी फाशी घेतोय..  एस एस वऱ्हाडे, भद्रकाली माता साहेबानी माला प्रचंड त्रास दिलेला आहे, मला कधीही जातायेता धमक्या दिल्या आहेत. तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला जेवढे जगायचे आहे, तेवढे जगून घे...त्यांनी मला खुप त्रास दिला आहे, त्यांनी फाशी घ्यायला मला मजबुर केलं आहे, माझ्या आई-वडीलांना, भावाला त्रास करु नका, वऱ्हाडे साहेबांनीच मला त्रास दिला आहे, बाकी कुणी नाही; असे सांगताना दिसत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यातील साहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगीतले आसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

भिमवाडी परिसरत प्रचंड तणाव

सकाळी कुटुंबीय त्यास झोपेतून उठविण्यासाठी गेले असता. घडलेला प्रकार उघडकीस आल्याची माहिती परिसरातील रहिवास्यानी दिली. योगेशने तयार केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावरुन शहरासह तो राहत असलेल्या परिसरात पसरताच रहिवास्यानी भिमवाडी परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले.  भद्रकाली पोलिसाना माहिती मिळात ते घटनास्थळी दाखल. दरम्यान पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, प्रदीप जाधव, मुंबईनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक दत्ता पवार यानी घटनास्थळी भेट दिली. मयतच्या कुटूंबीयांशी चर्चा केली. दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृताची आई आणि भाऊ यानी सांगीतले. त्यामुळे परिसरत प्रचंड तणाव पसरला. ताबे यांनी त्यांची समजूत काढली. वरिष्ठ पातळीवर तपास सुरु आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हेशाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अधिक चौकसी सुरु आहे. तपासाअंती योग्य ती कारवाई होणार. 
अमोल तांबे (पोलिस उपायुक्त) 

पोलिस नेहमी येवून त्रास देत असत. गुन्हा केला नाही. तरी योगेशचे नाव घेत त्यांच्यावर कारवाईची धमकी देत होते. 
येनुबाई हिवाळे (मृताची आई) 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

योगेश व्हिडीओ प्रसारीत केला आहे. त्यात पोलिस अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. त्यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 
बाबासाहेब हिवाळे (मृताचा भाऊ)