पोलिसाच्या त्रासाला कंटाळून नाशिकमध्ये आणखी एकाची आत्महत्या; चिठ्ठीत सांगीतले कारण

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील आधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच  गाजत असतांनाच, पंचवटी पोलिस ठाण्यातील पोलिसाच्या छळाला कंटाळून त्याच्या साडूने आत्महत्या केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. 

पत्नीची गळफास घेत आत्महात्या...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुणाल गायकवाड व बिना उर्फ प्रिया निकम यांचा विवाह २०१४ ला झाला. विवाहानंतर प्रियाचा पती कुणाल, सासू नंदा गायकवाड, सासरे विलास गायकवाड, दिर योगेश गायकवाड, नणंद तनुजा रासकर, तृष्णा फुलसुंदर यांनी प्रियाकडे फुलांचा व्यावसाय करण्यासाठी पैशांची मागणी करीत शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याच्या त्रासाला कंटाळून २१ ऑक्टोबर २०२० ला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्त्येनंतर पंचवटी पोलिस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयितांना अटक करण्यात आली होती. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

कुणाल विलास गायकवाड (वय ४०, रा. हिरावाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पत्नीच्या आत्महत्येनंतर तरुंगातून सुटल्यानंतर पून्हा साडू असलेल्या पोलिसांकडून त्रास सुरु झाल्याने त्याने आत्महत्या केली. १९ फेब्रुवारीला त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिस कर्मचाऱ्याचे व त्याच्या नातेवाईकांचे नावांचा उल्लेख केला आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठीत लिहीले आत्महत्त्येचे कारण

हे सर्व संशयीत जामीनावर बाहेर आल्यानंतर कुणाल गायकवाड याला पोलिस कर्मचारी असलेला साडू मनोज खैरे, मेहुणी सोनाली सोनवणे, ज्योती खैरे, वृषाली महाजन, सासरे रमेश निकम, माणिक महाजन या सर्वांनी मोबाईलवर फोन करून तू जास्त उड्या मारु नको, तुझे व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे असून, हे पोलिस अधिकाऱ्यांना देऊन तुला पुन्हा जेलमध्ये पाठवू अशा धमक्या देत. तू आमचे पैसे आणि दागिने परत कर अशी धमकी देत एका लग्नसमारंभात शिवीगाळ करून टॉर्चर केल्याने कुणाल गायकवाड याने आत्महत्त्या केली. मृत कुणाल याने त्याच्या वडिलांच्या हॉस्पीटलच्या फाईलवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आत्महत्त्येचे कारण लिहिलेले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयीतांची नावांचा उल्लेख आहे. तसेच तो नशेत असल्याचा उल्लेख केलेला आहे 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा